भुसावळात पालिकेतर्फे सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी

भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात असून शहरातील विविध भागामधुन निर्जंतुकीकरणावर भर दिला जात आहे त्याच पार्श्‍वभूमीवर येथील डेली बाजारात नागरीकांची गर्दी होत असल्याने रविवारपासून हा बाजार बंद करण्यात आला त्याऐवजी शहरातील विविध सहा ठिकाणी भाजीबाजार भरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोमवारी डेली बाजार (भाजीपाला बाजार) भागात पालिकेच्या पथकातर्फे सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी
करण्यात आली तसेच वर्दळीचा जामनेर रोडवरही फवारणी करण्यात आली. मुख्याधिकारी करुणा डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध वर्दळीच्या ठिकाणी फवारणीला प्राधान्य देण्यात आले आहे.
दरम्यान ही फवारणी शहरात सर्वत्र करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी करुणा डहाळे यांनी सांगितले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *