आमोद्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्याकरीता स्पेशल सर्व्हे ;बाहेरून येणार्‍यांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के

फैजपूर –
आमोदा येथे स्थापन करण्यात आलेल्या ग्रामस्तरीय समितीने गावात बाहेर गावाहुन आलेल्या नागरीकांचा सर्व्हे करून जनजागृती सुरू केली आहे. अशा नागरीकांच्या हातावर होम क्वॉरन्टाईचे शिक्के मारणे सुरू असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बर्‍हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोणा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.फिरोज तडवी यांच्याकडून कोरोना व्हायरस या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभाग सतर्क आहे. बाहेरून आलेल्या नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. आमोदे येथे स्थापन करण्यात आलेल्या ग्रामस्तरीय समितीमधील पदाधिकारी दररोज बाहेर गावाहुन आलेल्या नागरीकांना हिंगोणा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेऊन तपासणी करण्यात येत आहे.
आमोदा सरपंच राहुल तायडे, ग्रामविकास अधिकारी शरद नारखेडे, तलाठी मधुकर खुर्दा, मंडल अधिकारी बंगाळे, पोलिस पाटील तुषार चौधरी, आशा स्वयंसेविका मनिषा वैष्णव व इतर सहकारी, आरोग्य सेविका व्ही.व्ही. तळेले, ग्रामपंचायत कर्मचारी निलेश पाटील, कोतवाल लिलाधार सपकाळे, संगणक परीचालक संजय कपले यांनी गावात घरोघरी जाऊन ‘काँरटाईन होम’ हा शिक्का बाहेरून आलेल्या नागरीकांचा डाव्या हातावर मारुन घराबाहेर जाऊ नये, असा सल्ला देत आहे. आमोदे येथे बाहेर गावाहून आलेल्या ९६ नागरीकांची नोंद करण्यात आली असल्याचे संबंधितांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *