रावेरात सव्वा लाखांच्या गुटख्यासह दोघे जाळ्यात

रावेर –
मध्यप्रदेशातील बर्‍हाणपूरमधून महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा घेऊन येणार्‍या चारचाकीतून तब्बल सव्वा लाखांच्या गुटख्यासह दोघांना रावेर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. शहरातील व्ही.एस.नाईक कॉलेजनजीक ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे अवैधरीत्या गुटख्याची वाहतूक करणार्‍यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.गोपनीय माहितीवरून कारवाई
बर्‍हाणपूर येथून महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा सिगारेटची पाकिटे चारचाकी (एम.एच. 19 -2955) या वाहनात याावलच्या दिशेने जात असल्याची माहिती रावेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे व सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता. मंगळवारी सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास वाहन रावेरात आल्यानंतर सोयब खान व साजीद खान (रा.बाबूजी पूरा, यावल) यांना अटक करण्यात आली. ही कारवाई भागवत धांडे, महेंद्र पाटील, मंदार पाटील, पुरूषोत्तम पाटील, हर्षल पाटील, सतीष सानप आदींनी केली.
रावेर पोलिसांनी पकडलेल्या गुटख्याचा बुधवारी सकाळी येऊन पंचनामा करून रावेर पोलिसात गुन्हा दाखल करणार असल्याचे अन्न व प्रशासन अधिकारी विवेक पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *