रेल्वे जी.एम.यांना विविध मागण्यांबाबत सीआरएमएस संघटनेचे निवेदन

भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळात पीओएच वर्कशॉपच्या पाहणीसह विविध विभागाला भेटी देण्यासाठी आलेले मध्य रेल्वेचे जीएम संजीव मित्तल यांना सेंट्रल रेलवे मजदूर संघ पीओएच शाखेतर्फे शुक्रवार दिनांक ६ मार्च रोजी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तत्पूर्वी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. मागण्यांमध्ये यावल नाका ते झेडटीसी पर्यंतच्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, नवीन रेल्वे क्वार्टरचे निर्माण करण्यात यावे, पीओएच वर्कशॉपमधील दीर्घकाळापासून रीक्त असलेली पदे त्वरीत भरावीत, वाढत्या वर्कलोडसाठी कर्मचार्यांची अतिरीरक्त पदसंख्या वाढविण्यात यावीत, प्रतिवर्ष लोको इंजिनची ओव्हरहलिंग करण्याची संख्या वाढत असल्याने त्या प्रमाणातत वर्कशूपच्या जागेचेही विस्तारीकरण करावे, वर्कशॉपमधील पाण्याची समस्या सोडवावी आदी मागण्यांचा त्यात समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *