शिवजयंती निमित्त आज बैठकीचे आयोजन

भुसावळ- छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथी नुसार दि. १२ मार्च रोजी शहर व तालुक्‍यात जयंती साजरी होणार आहे.
यानिमित्त उद्‍या रविवार दि.१ मार्च रोजी ४ वाजता महत्वाच्या बैठकीचे आयोजन शासकीय विश्रामगृहात करण्यात आले आहे.
तरी भुसावळ शहर व तालुका शिवसेना,काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस ,मित्रपक्ष महाआघाडी प्रमुख पदाधिकारी,आजी माजी नगरसेवक ,आजी माजी तालुका व शहर पदाधिकारी,आजी माजी तालुका व उप तालुका पदाधिकारी,आजी माजी शहर उप शहर प्रमुख ,विभाग -उप विभाग प्रमुख , सर्व महिला आघाडी, युवासेना , सर्व अंगिकृत संघटना,सर्व शिवसैनिक व महाआघाडीच्‍या सर्व कार्यकर्ते
यांनी बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक भुसावळ शहर व तालुका, महाविकास आघाडी यांनी केले असल्याचे शिवसेना प्रसिद्धिप्रमुख गोकुळ बाविस्कर यांनी कळविले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *