बार्टीच्या समतादुतांकडून आरटीईबाबत भुसावळ तालुक्यात मार्गदर्शन

भुसावळ (प्रतिनिधी )- डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे 12 मार्चपासून बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण कायदा राईट टू एज्युकेशन अंतर्गत इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मोफत प्रवेश अर्ज करण्यासाठी ऑनलाईन फार्म भरण्याची विनामूल्य मोफत सेवा भुसावळ तालुक्यात दिली जात आहे. बार्टीच्या समतादूत शिल्पा मालपुरे या आरटीईचे विनामूल्य फॉर्म भरण्यासंदर्भात माहिती देत आहेत. वंचित घटकांना या कायद्याची माहिती मिळावी तसेच त्यांची मुलेदेखील इंग्लिश मिडियम शाळेत जाण्यासाठी हा उपक्रम स्तुत्य ठरला आहे. भुसावळ तालुक्यात बार्टीच्या समतादूत शिल्पा मालपूरे या वस्तीत तसेच ठिकठिकाणी खेड़यां मधील गावांवर जावून फार्म भरण्याचे काम करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *