भुसावळ (प्रतिनिधी )-
शिवसेना महिला आघाडी मुक्ताईनगर प्रभाग १ येथील शाखेचे जल्लोशात उद्घाटन संपन्न झाले .
शिवसेना आमदार चंद्रकांत पाटिल, संपर्क प्रमुख विलास पारकर, यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महिला आघाडी रावेर लोकसभा मतदार संघ संपर्क प्रमुख उषा मराठे यांच्या नेतृत्वात मुक्ताईनगर (रावेर लोकसभा) येथे महिला आघाडी जिल्हा संघटक सौ कल्पना पालवे यांच्या अनमोल सहकार्याने येथील प्रभाग क्रमांक १ येथे महिला आघाडिच्या शाखेचे ढोल ताश्यांच्या गजरात तसेच ‘शिवसेना जिंदाबाद, ‘जय भवानी’ जय शिवाजी ‘ च्या घोषात थाटामाटात उषा मराठे यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन संपन्न झाले .
यावेळी मुक्ताईनगर प्रभाग १ मध्ये आयोजित कार्यक्रमात प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज ,हिन्दुहॄदयसम्राट बाळासाहेब ठाकरे , यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले .तदनंतर शिवसेना महिला आघाडी रावेर लोकसभा मतदार संघ संपर्क प्रमुख उषा मराठे यांच्या हस्ते शिवसेना महिला आघाडी शाखेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले . प्रसंगी मुक्ताइनगरच्या महिला आघाडी जिल्हा संघटक सौ. कल्पना पालवे, सौ.पूनम ब-हाटे (भुसावळ), तालुका संघटक मुक्ताइनगर सौ शोभा शिरसाठ , सौ .भूराबाई चव्हाण , सौ सरिता कोळी, आदी मान्यवर उपस्थित होते . मान्यवरांचा सत्कार आयोजकांनी केला . यावेळी उषा मराठे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले .
कार्यक्रम यशस्वीतेकरीता शाखा संघटक सौ मराठे व शाखा पदाधिकारी तसेच महिला शिवसैनिकानी परिश्रम घेतले .




