गोजोरा व कु-र्हे-पानाचे येथील दोघांचा मृत्‍यू

भुसावळ- (प्रतिनिधी )-
तालुक्‍यातील गोजोरा व कु-र्हे-पानाचे येथील दोघांचा वेगवेगळया घटनेत मृत्‍यू झाल्‍याच्‍या घटना घडल्‍या असून या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्‍यात अकस्‍मात मृत्‍यूची नोंद करण्‍यात आल्‍या आहे.
गोजोरा येथील ईच्‍छाराम रामदास सपकाळे(वय ३७)यास मुळव्‍याधच्‍या आजाराने अशक्‍तपणाने चक्‍कर येत असल्‍याने जळगाव येथील जिल्‍हा सामान्‍य रूग्‍णालयात उपचारार्थ दाखल करण्‍यात आले होते.उपचारा दरम्‍यान त्‍याचा मृत्‍यू झाला.या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्‍यात अकस्‍मात मृत्‍यूची नोंद करण्‍यात आली आहे. तर कु-र्हे पानाचे येथील बारी वाड्‍यातील रहिवासी ज्ञानेश्‍वर सुकलाल बारी (वय २८)या तरुणाने गावातील राममंदीरा जवळील विहीरीत उडी घेऊन आत्‍महत्‍या केली. या अकस्‍मात मृत्‍युच्‍या घटनांचा तपास अनुक्रमे पोनि.रामकृष्‍ण कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि.अमोल पवार व पोहेकाॅ.युनूस शेख हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *