बोदवड (प्रतिनिधी )-
बोदवड शहरात सेवा संघर्ष समिती तर्फे दि २३ फेब्रुवारी रोजी आयोजित श्री संत गाडगे बाबा जयंती निमित सकाळी 8:30 वाजेच्या स्वच्छता अभियान रॅली काढण्यात आली . रॅलीमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख तथा मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी
स्वत: हातात झाडू घेत सर्वाना स्वच्छतेचा संदेश दिला . तसेच शहाराच्या विविध भागात स्वच्छता मोहीमेत पूर्णत: सहभाग नोंदवला.
यावेळी आपण व आपला परिसर स्वच्छ ठेवून निरोगी जिवन जगण्यायाकरीता स्वच्छतेची सवय अंगीकारावी तसेच आपली व परिसराच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन आ . पाटिल यांनी नागरिकांना केले .



