भुसावळात महाशिवरात्री उत्साहात साजरी भाविकानी घेतला शिवदर्शनाचा लाभ : फ़राळ वाटपासह विविध उपक्रमांचे आयोजन

भुसावळ (प्रतिनिधी )-
महाशिवरात्री निमित्त शहर व परिसरात शिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरा करण्यात आला. यानिमित्त अनेक ठिकाणी भाविकाना फराळ (साबूदाना खिचडी) केळी, दूध आदी फराळ वाटप करण्यात आले . या पवित्र पर्वावर शहरातील विविध शिवमंदिर सजविण्यात आली होती.
महाशिवरात्री निमित्त पहाटे पासूनच मंदिरे दर्शनार्थ खुली ठेवण्यात आली.पहाटे पासून शिवास महाअभिषेक , जलाभिषेक , शिवरुद्रा अभिषेक घालण्यात येवून साज श्रृंगार करण्यात येवून मंत्रोच्चारात विधिवत पूजापठन करण्यात आले . जागरण , कीर्तन , शिवपारायन आदी सह रुद्राभिषेक धर्मिक कार्यक्रम संपन्न झाले .
शहरातील रानातला महादेव मंदिर, मोठा महादेव मंदिर, ओंकारेश्वर मंदिर, तापी तीरा वरील बारा ज्योतीर्लिंग,मंदिर, यासह विविध भागातील शिव मंदिरात पूजाअर्चना , महाअभिषेक व महाआरती करण्यात आली . श्री क्षेत्र कंडारी महादेव मंदिर येथे दर्शनाकरीता भाविकानी अलोट गर्दी केली होती . मंदिर परिसरात हर हर महादेव , बम बम भोले, शंभो शिव पार्वती की जय आदी घोषणां नी परिसर दुमदुमला .
शिव मंदिराबाहेर बेल पूजा, फुलहार , नारळ, पुजेचे साहित्य विक्रेत्यानी दुकाने लावली होती .
महाशिवरात्री निमित्त फराळाची दुकाने ठिकठिकाणी थाटली होती .केळी, रताळे, चिप्स, मावा जिलेबी यासह साबूदाना खिचड़ी व वडे, राजगीरा लाडू, मोसंबी, सफ़रचंद, संत्री, बटाटे व्हेपर्स, चिक्की आदी फराळ पदार्थ विक्रिचे दुकाने सजली होती.
कपिलेश्वर ग्रुप व गोसेवक परिवार तर्फे उपवासकरुना दूध व फळ वाटप
भुसावळ – कपिलेश्वर ग्रुप व गोसेवक परिवार यांच्यावतीने येथील रेल्वे स्थानक व बस स्थानक परिसरानजिक प्रवासी व नागरिकांच्या उपवासा बद्दल काळजी घेण्यात आली.शुक्रवार रोजी संपूर्ण दिवसभर उपवासा निमित्त फराळा करिता दूध व( केळी) फळ वाटप करण्यात आले .
यावेळी पवन बॉक्से, नीलेश वाणी, उमाकांत शर्मा, डॉ भरत महाजन,जीतू भाई, लोकेश वारके, मयूर जाधव, रोहित महाले,शुभम पचरेवाल मिलन साली, किरण भाई,श्याम शर्मा, राजेश ठाकुर,ब्रजेश व्यास, राजू पाटिल, कृष्णा साली, भुषण महाजन, आदि मित्र परिवार उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *