संविधान बचाव समितीच्या साखळी उपोषणकर्त्यांचे अर्धनग्न आंदोलन

भुसावळ (प्रतिनिधी ) सीएए व एनपीआर कायदयाचे विरोधात येथील संविधान बचाव समिती च्यावतीने गुरुवार २० रोजी साखळी उपोषणाच्या ३१ व्या दिवशी अर्धनग्न आंदोलन करण्यात आले ,यावेळी सीएए व एनपीआर कायदयाचे विरोधात
केंद्र सरकार विरोधी घोषणा देण्यात येवून आज २० रोजी चा निषेध नोंदविन्यात आला . तसेच याबाबतीतचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले . यावेळी सलीम चूडिवाले, अशरफ कुरेशी , यूनुस मामा, अजहर शेख, वासिफ सैयद, मोहम्मद आबिद ,इमरान खान ,फरान भाई, डॉ. इमरान शेख, फरीद सलीम खान, लियाकत अली ,भगवान मेढ़े ,रूप ठेकेदार ,दानिश पटेल, जुनेद खान, मोहसिन शेरू बिल्डर यांचेसह बचाव सामिती पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .
दरम्यान सन १९११ मध्ये २०फेब्रूवारी रोजी ” जन-गण-मन ” हे राष्ट्रगीत गायिले होते .या घटनेची आठवण म्हणून संविधान बचाव सामिती ने राष्ट्रगीत म्हनून मानवंदना देण्यात आली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *