सुरत पॅसेंजर आज पाळधीपर्यंत धावणार

भुसावळ-रेल्‍वे प्रशासनातर्फे भादली ते जळगाव दरम्‍यान ब्लॉक घेण्‍यात आला असून त्‍यामुळे काही गाड्‍यांच्‍या वेळात व धावण्‍याच्‍या स्‍थानकांमध्‍ये एका दिवसासाठी बदल करण्‍यात आल्‍याची माहिती भुसावळ रेल्‍वे वाणिज्‍य विभागाने दिली आहे.
यात गाडी क्रमांक ५९०१४ अप भुसावळ सुरत पॅसेंजर ही गाडी दिनांक १८ फेब्रुवारी रोजी भुसावळ स्थानकाऐवजी धरणगाव स्थानकावरून सुटेल त्‍यामुळे ही गाडी भुसावळ- धरणगाव दरम्‍यान रद्द राहील तर
गाडी क्रमांक ५९०७६ भुसावळ सुरत पॅसेंजर दिनांक
१८ रोजी पाळधी स्थानकावरून सुटून भुसावळ पाळधी दरम्‍यान रद्द राहील.
गाडी क्रमांक १९००४ अप भुसावल बांद्रा खानदेश एक्सप्रेस ही गाडी सुध्‍दा दिनांक १८ रोजी पाळधी स्थानकावरून सुटून भुसावळ-पाळधी दरम्‍यान रद्‍द राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *