वंचित बहुजन आघाडी रावेर लोकसभा सर्व पदाधिकारी, युवक आघाडी, जिल्हा महिला आघाडी पदाधिकारी यांची तातडीची बैठक बुधवार, १९ फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता शामाप्रसाद मुखर्जी उद्यानात आयोजित केली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने तत्काळ विधान सभेचे विशेष अधिवेशन सत्र बोलावुन सीएए, एनपीआर व एनआरसी विरोधात ठराव पारीत करावा, या मागणीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा, तालुका अध्यक्षाच्या कार्यालयावर विनंती मोर्चे काढण्यासाठी बैठकीत नियोजन करून चर्चा केली जाणार आहे. बैठकीत जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार,जिल्हा महासचिव दिनेश इखारे, जिल्हा महासचिव वंदना सोनवणे, जिल्हा उपाध्यक्षा संगीता भामरे मार्गदर्शन करणार आहेत. उपस्थितीचे आवाहन जिल्हा महासचिव दिनेश इखारे, जिल्हा सचिव संजय सुरडकर, भुसावळ तालुकाध्यक्ष रुपेश साळुंके, भुसावळ शहराध्यक्ष गणेश जाधव यांनी केले आहे.



