माजी नगरसेवक परीक्षीत ब-हाटें यांना जीवे मारण्याची धमकी

भुसावळ (प्रतिनिधी )-
माजी नगरसेवक परीक्षीत ब-हाटे यांना जीवे मारण्याची धमकीमाजी नगरसेवक परीक्षीत ब-हाटे यांच्या मोबाईलवर जळगाव येथून एका व्यक्तीने शिवीगाळ करून त्यांना 30 दिवसात जीवे मारण्याची धमकी मेसेसद्वारे दिली आहे. ब-हाटे यांनी या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यता आला. परिक्षित ब-हाटे यांनी सांगितले की, मी दोन दिवसांपूर्वी दिल्ली येथे असतांना माझ्या मोबाईलवर मला शिवीगाळ करणारा आणि 30 दिवसाच्या आत जिवे ठार मारण्याची धमकी देणारा मेसेज आला. ब-हाटे हे दिल्ली येथून शनिवारी आल्यावर त्यांनी शहर पोलिस ठाणे गाठत पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांना भेटत त्यांना आलेला मेसेज दाखवला. याप्रकरणी ब-हाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित व्यक्ती विरूध्द तक्रार दाखल करण्यात आला. ब-हाटे यांनी याबाबत भाजप जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांची भेट घेऊन त्यांच्याही कानावर हा प्रकार टाकला आहे. याप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक यांचीही या प्रकरणी जिल्हाध्यक्ष जावळे हे भेट घेणार आहे, असे ब-हाटे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *