भुसावळ (प्रतिनिधी) : नगरपरिषदेतील सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्या मान्य होत नसल्याने अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला नगराध्यक्ष रमण भोळे यांना शुक्रवार दिनांक ७ रोजी मागण्यांचे निवेदन दिले . मुख्याधिकारी करुणा डहाळे या अनुपस्थित असल्याने त्यांच्या नावाच्या फलकावर आन्दोलनकर्ते यांनी हार घालून पालिकेच्या आवारात ठिय्या आंदोलन करून घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला .
संघटनेचे शहराध्यक्ष सुनिल कंडेरे, विलास खरात, महेंद्र महाले, राहुल कंडेरे, कन्हैया चंडाले, शिवम चंडाले, रोहिदास अटवाल, अजय कंडेरे, सुनिल जवरे, विजया ढिक्क्याव, कमल पथरोड यांनी नगराध्यक्ष रमण भोळे यांना मागण्याचे निवेदन दिले.
सफाई लाड पागे समितीच्या नियमानुसार सफाई कर्मचार्यांनी नियुक्ती व रक्कम अदा करावी, ग. स. व धुळे नंदूरबार, सोसायटीचे हप्ते कपात पगारातून थांबवावे व करार दाखवावे, राष्ट्रीयकृत बँकेशी करार करुन कर्ज मर्यादा 10 लाखांपर्यंत करावी, नियम डावूलून व परिपत्रकानुसार काम न करणार्या अधिकार्यांविरुद्ध कारवाई करुन निलंबित करावे आदी मागण्या अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आल्या आहेत .
यावेळी नगरसेवक वसंत पाटील, बोधराज चौधरी, बापू महाजन, मुकेश पाटील, अजय नागराणी, सतिश सपकाळे आदी उपस्थित होते.



