भुसावळ – सुरत पॅसेंजरला दोन स्लिपर व जनरल कोच लागणार

भुसावळ (प्रतिनिधी )-
रेल्वे प्रशासनाने भुसावळ-सूरत आणि सुरत-भुसावळ पैसेंजर मध्ये कायम स्वरुपी स्लीपर कोच व जनरल कोच वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
ट्रेन क्रमांक – 59014 आणि ट्रेन क्रमांक – 59013 भुसावळ – सूरत आणि सूरत – भुसावळ पॅसेंजरमध्ये शुक्रवार ७फेब्रूवारी २०२० पासून प्रस्थान स्टेशन पासून 1 स्लीपर क्लास आणि 2 सामान्य (जनरल बोगी) कोच लावण्यात येणार . तर ट्रेन क्रमांक – 59076 आणि गाडी क्रमांक – 59075 भुसावळ – सूरत आणि सूरत – भुसावळ पॅसेंजर मध्ये दिनांक ७ पासून प्रस्थान स्टेशनवरून २ स्लीपर क्लास आणि २ सामान्य बोगी लावण्यात येईल . ट्रेन क्रमांक – 59078 आणि रेल्वे क्रमांक – 590 77 भुसावळ – सूरत आणि सूरत – भुसावळ पॅसेंजरमध्ये ७ फेब्रूवारी पासून प्रारंभी स्टेशन वरून २ स्लीपर क्लास आणि २ जनरल बोगी बसविण्यात येणाऱ आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *