भुसावळ (प्रतिनिधी )-
कै.यशोदाबाई दगडु सराफ चॅरिटेबल ट्रस्ट संचलीत कॉलेज ऑफ फार्मसी, साकेगाव-भुसावळ येथ खुले चर्चासत्राचे दि. १० फेब्रुवारी २०२० रोजी आयोजन करण्यात आले आहे. बी. फार्मसी व एम फार्मसी या कोर्सेचे २०१७ मध्ये नविन अभ्यासक्रम औषधनिर्माणशास्त्र परिषद नवी दिल्ली यांच्या मार्फत लागू करण्यात आला. तरी या अभ्यासक्रमावर हे खुले चर्चासत्र (“New Regulations for B. Pharmacy, M.
Pharmacy syllabus of PCI, New Delhi and any suggestion in thir off”) न्यू रेग्युलेशन फ़ॉर बी.फार्मसी , एम फार्मसी, सिलेबस ऑफ पीसीआय, न्यू दिल्ली अँड एणी सजेशन इन देअर ऑफ या विषयांवर चर्चासत्र आयोजित केले आहे. या चर्चासत्रासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन प्रा. पी. पी. पाटील (कुलगुरु, कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठ, जळगाव) व डॉ. एम. डी. कर्वेकर (मा. कार्यकारी समिती सदस्य औषधनिर्माणशास्त्र परिषद, नवी दिल्ली) येणार आहेत. या कार्यक्रमासाठी सम्मानिय अतिथी म्हणुन प्रा. डॉ. पी. पी. माहुलीकर (उपकुलगुरु, कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव), प्रा. डॉ. बी. व्ही. पवार (कार्यकारी निबंधक कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठ, जळगाव) प्रा. डॉ. व्ही. आर. पाटील (सहय्यक अधिष्ठाता कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव), प्रा. डॉ. एस. जे. सुराणा व प्रा. डॉ. एस. बी. बारी येणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रमुख संस्थेचे अध्यक्ष पी. डी. सराफ, सचिव एस. पी. इंगळे आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. डॉ. पी. आर.
पाटील यांनी केले आहे. तरी प्राचार्य व प्राध्यापकांनी या चर्चासत्रात सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे .



