भुसावळ (प्रतिनिधी )-
माजी आमदार तथा खासदार स्व.हरीभाऊ जावळे यांची ३ ऑक्टोबर रोजी असलेल्या जयंती निमित्ताने अंतर्नाद प्रतिष्ठान भुसावळच्या वतीने भुसावळ बस स्थानक परिसरातील ५० गरीब आणि गरजू कुटुंबाना किराणा वाटप करण्यात आला.यात गहू, तांदूळ, दाळ, तेल, साबण अस साहित्य देण्यात आले.
संचारबंदीच्या काळात अंतर्नाद तर्फे साधारण २५० कुटूंबाना किराणा वाटप करण्यात आला होता.त्यात धुण भांडी करणाऱ्या महिला, गवंडी काम करणारे कारागीर, हातमजूर, दुकानात काम करणारे नोकर, परराज्यातील मजूर, बैंजो पार्टी कलाकार अश्या समाजातील विविध गरीब आणि गरजू घटकांना मदतीचा दिला होता.आता शेवटच्या टप्यात स्व.हरीभाऊ जावळेंच्या जयंती निमित्ताने हि मदत करण्यात आली आहे.
स्व.हरीभाऊ जावळे यांचे वाढदिवस सातत्याने समाज उपयोगी कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरे केले जायचे.किबहुना त्यांचा तसा आग्रहच असायचा.हिच भावना आणि उद्देश लक्षात घेउन अंतर्नाद प्रतिष्ठानने त्यांच्या जयंती निमित्ताने गरीब आणि गरजूंना किराणा वाटप करून एक हात मदतीचा दिला आहे.
या प्रसंगी माजी गस संचालक योगेश इंगळे , नूतन प्राथमिक शिक्षक पतपेढी संचालक प्रदिप सोनवणे, जिवन महाजन, भूषण झोपे, अमित चौधरी, अमितकुमार पाटील, समाधान जाधव आणि अंतर्नादचे अध्यक्ष संदिप पाटील उपस्थित होते.



