दिपनगरमध्ये ब्लास्ट ,एक तरुण जखमी


भुसावळ (प्रतिनिधी )-
तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र महाजनको कंपनी दिपनगर येथे आज मंगळवार रोजी सायंकाळी ब्लास्ट झाल्याची घटना घडली .
. यामध्ये सचिन शिंदे नामक तरुणांच्या अंगावर केमिकल पडल्याने तो जखमी झाल्याचे समजते .
दरम्यान भुसावळतील रिदम हॉस्पिटलमध्ये जखमी तरुणास उपचारासाठी आणले असता त्यावर प्रथमोपचार करून
पुढील उपचारासाठी जळगाव मधील आर्किड हॉस्पिटलला रवाना करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *