जळगाव –
येथील पोलिस अधिक्षक डाॅ. पंजाबराव उगले यांची बदली झाल्याने रिक्त झालेल्या पदाचा पदभार आज दि.२२ सप्टेंबर मंगळवार रोजी सकाळी
नूतन पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी मावळते पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्याकडून स्विकारला.
प्रसंगी जिल्ह्यातील भौगोलिक व गुन्हेगारी पार्श्वभूमि बाबत माहिती एसपी डॉ. पंजाबराव उगले यांनी डॉ. मुंढे यांना दिली.तसेच कार्यालयीन पत्र आणि पुष्पगुच्छ तसेच सॅनिटायझर देऊन मुंढे यांना पदभार सोपविला.
यावेळी जळगाव जिल्हा गुन्हेगारी मुक्त करण्याचा निर्धार व्यक्त करीत डॉ.मुंढे म्हणाले की जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यावर अधिकाधिक भर दिला जाऊन काम केले जाणार आहे. गंभीर गुन्ह्यांवर आणि गुन्हेगारांवर वचक ठेवण्याचे ध्येय राहील. पोलीस प्रशासन हे जनतेसाठी आहे आणि जनतेसाठी काम करेल, असेही डाॅ.मुंढे म्हणाले.
प्रसंगी अप्पर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके, सचिन गोरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन उपस्थित होते.



