भुसावळ (प्रतिनिधी )-
तालुक्यातील शिक्षकांना माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत दररोज पन्नास कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे त्यात विविध प्रकारच्या 22 मुद्द्यांची माहिती भरावी लागते या कामकाजात शिक्षकांचा संपूर्ण दिवसाचा वेळ वाया जातो त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणावर विपरित परिणाम होत आहे,सदर माहिती ही ऑनलाईन करण्याची जबाबदारी शिक्षकांवर देण्यात आलेली असल्याने शिक्षकांच्या दैनंदिन शालेय कामकाजावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. सदर नियुक्तीसंदर्भात शिक्षकांना या कामातून वगळण्यासाठी शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार दीपक धिवरे गटविकास अधिकारी विलास भाटकर गटशिक्षणाधिकारी तुषार प्रधान गटविकास अधिकारी यांची भेट घेतली व निवेदन दिले
या निवेदनात म्हटले आहे की
माझे कुटुंब माझी जबाबदारी या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 11 सप्टेंबर च्या पत्रात म्हटले आहे की शिक्षकांना सदरील कामाची जबाबदारी देण्याबाबत स्पष्ट उल्लेख नसतानाही सदर परिपत्रकाचा सोयीस्कर अर्थ लावून शिक्षकांचा नाहक त्यामध्ये समावेश करण्याचे धोरण अत्यंत चुकीचे आहे
शिक्षणाधिकारी प्राथमिक जि. प. जळगाव यांचे आदेशानुसार कोरोना पार्श्वभूमीवर सेवा अधिग्रहीत केलेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करून शिक्षकांना शालेय वेळेत अध्ययन अध्यापनाचे कामकाज करण्याबाबत आदेशित करण्यात आलेले आहे.
त्यामुळे शिक्षकांची कोरोनाबाबत ज्या ज्या ठिकाणी नियुक्ती असेल त्या ठिकाणाहून कार्यमुक्त करण्यात यावे.वय वर्ष ५० वरील बिपी,शुगर आणि इतर व्याधिग्रस्त शिक्षकांना आदेशित केलेले आहे त्यांना या कामातून वगळण्यात आलेले नाही.
सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षकांना इतर विभागांच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे पन्नास लाख रुपये आरोग्य विमा सुरक्षा कवच देण्यात आलेले दिसून येत नाही. सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षकांच्या सुरक्षेसाठी मास्क, पिपीई किट, अल्पोपहार भत्ता व वाहतूक भत्ता याची तरतूद केलेली दिसून येत नाही.कोरोना बाबत कंटेनमेंट झोन, चेक पोस्ट , कोरोना केअर सेंटर तसेच रेल्वे स्टेशन ड्युटी याबाबत आजपर्यंत शिक्षकांनी जे निस्वार्थी सेवा केलेली आहेत त्याबद्दल आपले विभागातर्फे इतर उपविभागीय कार्यालय प्रमाणे कोविंड योद्धा सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलेले नाही त्याबाबतही विचार व्हावा.सदर कामांतून महिला भगिनी शिक्षकांना वगळण्यात यावे.
तसेच शिक्षकांना ऑनलाईन ऑफलाइन शिक्षण शालेय वेळेत देणे सुरू असल्याने सदर कामकाज केल्याने शालेय अध्ययन-अध्यापन प्रक्रिया वर परिणाम हा होत आहे.
तरी वरील समस्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून सदर माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहीमेच्या सर्वेक्षण कार्यातून शिक्षकांना वगळण्याची मागणी करण्यात आली आहे
या निवेदनावर गजानन नारखेडे प्रदीप सोनवणे राजेंद्र राजेंद्र डाके मनीषा घुले समाधान जाधव अतुल पाटील विलास तायडे जीवन महाजन मिलिंद कोल्हे सूर्यकांत घुले राजेंद्र सुरवाडे प्रमोद गांधेले दिपाली भंगाळे दीपक पाटील कमलेश शमकुवर अनिल दांडगे शबाना परवीन रवींद्र मनीषा चव्हाण आदींच्या सह्या आहेत



