भुसावळात जनता कर्फ्यूला शंभर टक्के प्रतिसाद ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी शनिवारी झालेल्या बैठकीनुसार आठवड्यातून मंगळवार व शनिवारी दोन दिवस जनता कफ्र्यू पाळला जाणार आहे. त्यानुसार मंगळवारी २१रोजी जनता कर्फ्यू पाळण्यात आला.
नागरिकांनी देखील सहकार्य करीत कर्फ्यूत सहभाग घेतला. यामुळे रस्त्यावर सकाळपासुनच शुकशुकाट दिसुन येत होता. या कर्फ्यूत जीवनावश्यक श्रेणीतील भाजीपाला विक्री व किराणा दुकाने बंद राहीली तर दुधाची विक्री सकाळी ७ ते १० व दुपारी ४ ते सायंकाळी ७ या काळातच केली गेली. हॉस्पिटल, मेडिकलची सेवा नियमितपणे २४ तास सुरू होती जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार भुसावळ नगरपालिका हद्दीत ७ ते १३ जुलै दरम्यान लॉकडाऊन झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी १४ जुलैपासून शहर अनलॉक करताना पालिका हद्दीत आठवड्यातून किमान दोन दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे निर्देश दिले होते. यानुसार जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला होता.
जनता कर्फ्यूवर नजर ठेवण्यासाठी पालिकेचे पथक तैनात करण्यात आले होते. जनता कर्फ्यूच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कारवाई केली जाणार असल्याचा यासोबत सर्वाधिक नजर कंटेन्मेंट झोनमधून बाहेर निघणाऱ्यांवर ठेवण्यात आली होती.
भुसावळ शहरात कोरोनाचे रुग्ण दररोज वाढत असून, ही बाब गंभीर आहे. आठवड्यातून दोन दिवस जनता कर्फ्यूच्या नियमांचे पालन केले तर संक्रमणाला आळा बसेल, यामुळे सर्वांनी कडक अंमलबजावणी केली पाहिजे. असे आवाहन नगराध्यक्ष रमण भोळे यांनी केले आहे.
शहरात जनता कर्फ्यूच्या काळात नागरिकांनी नियमांचे पालन करावे लागेल. अनावश्यक घराबाहेर पडू नये, कामावर जाणाऱ्यां तोंडावर मास्क लावणे, ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य राहील. शहरातील व्यापारी-विक्रेत्यांनी दुकाने उघडू नयेत, असे आवाहन करण्यात आले होते. शहरात ७ ते १३ जुलैदरम्यान कडक लॉकडाऊन झाला. मात्र या काळात शहरात काही ठिकाणी हातगाडीवरून भाजीपाल्याची विक्री केली जात होती. पालिकेच्या पथकाने अशा विक्रेत्यांवरही कारवाई केली होती. जनता कर्फ्यूच्या दिवशी शहरात हातागाडीवरून भाजीपाला किंवा अन्य फळे व इतर वस्तूंची विक्रीही बंद राहील. असे प्रकार आढळून आल्यास संबंधितां विरुद्ध दंडात्मक किंवा कायदेशीर कारवाई होईल असा देखील इशारा देण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *