भुसावळ (प्रतिनिधी )-
औरंगाबाद येथील एका ठेकेदाराने उत्तरप्रदेशातील सुलतानपुर(प्रयागराज)येथील ८ मजुरांना एक महीन्यापासून मजुरांना मजुरीचे पैसे न देता धमकी देऊन कामावरून गावी परत जाण्यास विवश केले होते. सुलतान पुर येथील हे आठ मजुर रातोरात औरंगाबाद येथून भुसावळसाठी पायी निघून भुसावळ येथून रेल्वेने जाण्यासाठी निघाले होते.त्यांना भुसावळ येथील ज्येष्ठ नागरिकांनी मदतीचा हात देऊन माणुसकीचे दर्शन घडवले आहे. भुसावळ स्थानकावरील रेल्वे तिकीट आरक्षण केंद्राजवळ त्यांना काही तिकीटांच्या दलालांनी हेरून एका तिकीटासाठी हजार ते बाराशे रूपयांची मागणी केली पैसे कमी असल्याने निराश होवून ते सर्व मजुरी पायी सुलतानपुर(इलाहाबाद)प्रयागराज जाण्यासाठी निघून गेले होते.स्थानिक १५ बंगला,वरणगाव रोडवर तेथील ज्येष्ठ नागरिक गृपला ते पायी जातांना दिसले.विचारपूस केली असता ते मजबुरीत रडू लागले.या मजुरांना ज्येष्ठ नागरिकांनी मदतीचे आश्वासन दिले.या आठ मजुरांकडील काही व काही मदत एकत्र करून २१ जुलै रोजी ०९०८३ डाऊन या गाडीचे तात्काळ रेल्वेचे तिकीट काढून त्यांना १९ जुलै पासून त्यांच्या निवास,नाश्ता व जेवणाची सोय करून दिली.आज दि.२१ रोजी सकाळी त्यांना आपल्या गावी सुलतानपुरसाठी रेल्वेने रवाना केले.



