भुसावळ (प्रतिनिधी )-
तालुक्यातील साकेगाव येथून जवळच असलेल्या तापी नदीच्या पात्रात खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या भुसावळ येथील दोन युवकांचे प्राण प्रसांगावधान राखून साकेगाव येथील काही नागरिकांनी वाचवल्याची घटना येथे बुधवार १५ जुलै रोजी घडली .
भुसावळ येथील दोन मुले तापी नदीवर खेकडे पकडण्या करीता आज बुधवार १५ जुलै रोजी गेले होते . खेकडे पकडण्याचे नादात नदीपात्रात खडकावर होते .
आज झालेल्या पावसामुळे हतनूर धरणाच्या ३६ दरवाजातून पाण्याचा मोठया प्रमाणावर विसर्ग होत असल्याने तापी नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याचे या युवकांच्या लक्षात आले नाही मात्र पाण्याचा प्रवाह वाढल्याचे दिसताच त्यांना तापी तीरा वर (काठ ) येता येत नव्हते ते पाण्यात अडकून पडले. अत्यंत भयभीत झाल्याने त्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
दरम्यान नदीचा पुर बघण्यास आलेले साकेगावातील काही युवक व नागरिकांच्या ही बाब निदर्शनास आली त्यांनी त्वरीत धावपळ करून दोर आणून अतिशय हिंमतीने त्या दोघां तरुणांना दोर बांधून बाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचले .



