रावेर (प्रतिनिधी )-
सातपुडयाच्या पायथ्याशी वसलेले रावेर तालुक्यातील पाल येथे गुरुपौर्णिमेनिमित्त ऑनलाइन उत्सव साजरा करण्यात आला . दरवर्षी पन्नास हजाराच्या आसपास देशभरातून चैतन्य साधक परिवारासह भाविक परम पुज्य सदगुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या समाधि दर्शनाकरिता श्रीवृन्दावन धाम पाल आश्रमात येतात त्यामधे महाराष्ट्रसह मध्यप्रदेशातुन शेकडो किमीचा दिंडी सोहळा पायी प्रवासकरुन पाल येथे येतात . परंतु यंदा कोरोनाचे सावट सर्वत्र पसरलेले असून यावर्षाची गुरुपौर्णिमा आपापल्या घरिच साजरी करण्याचे आवाहन आश्रमाचे विद्यमान गादीपति श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य महाराज यांच्या सह केंद्रीय समितीने केले होते.त्यामुळे साधकानी घरिच राहून ५ जुलै रोजी च्या गुरुपौर्णिमेचे परम पूज्य बापुजी समाधि दर्शन,तसेच पादुका पूजन, आरती व श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य महाराज यांच्या सत्संग अमृत वाणीचे लाभ आश्रमात संत महंत च्या सानिध्यात सोशल डिश्टिंग चे पालन करुन व ‘चैतन्य यूट्यूब चैनल’ च्या माध्यमातून घडविले.
या सत्संगात श्रधेय महाराज यांनी गुरुंचा महिमा वर्णन करतांना सांगितले की , आपले हृदयात काम, क्रोध,लोभ,मोह,व अहंकार रूपी पडदा बाजूला सारून गुरु हे ज्ञान व भक्तिरूपी परमात्माचे दर्शन घडवितात असे सांगून मार्गदर्शन केले तसेच गुरु विना मनुष्य भवसागर पार होऊ शकत नाही.संत नामदेव यांना छपन्न वेळा पांडुरंगानी दर्शन दिले होते तरीही त्यांना ज्ञान प्राप्त झाले नव्हते कारण त्यांना गुरु नव्हते परंतु ज्या वेळी त्यांनी संत विशोबा खेचर यांना गुरु मानले त्या वेळेस खरे अस्तित्व प्राप्त झाले या करिता जीवनात गुरु असणे आवश्यक आहे.



