भुसावळ (प्रतिनिधी)- नसरवांजी फाईल परिसरातील स्व. राजीव गांधी वाचनालय व ग्रंथालय येथे भारताचे पहिले शिक्षणमंत्री, थोर स्वातंत्र्यसैनिक आणि विचारवंत मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती ‘वाचन व प्रेरणा दिन’ म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने मौलाना आझाद यांच्या जयंती साजरी केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी वाचनालयाचे अध्यक्ष मो. मुनव्वर खान यांच्या हस्ते तसेच बालगोपालांच्या उपस्थितीत मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बालगोपाल अलीशबा, तनजीम, आरीज, आरशान खान, आयत खान, हाजीक आणि अरहम उपस्थित होते.



