भुसावळ काँग्रेस कमिटीतर्फे प्रांताधिकारी यांना निवेदन सादर ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
वरणगांव (हतनूर )ता.भुसावळ येथील राज्य राखीव पोलीस प्रशिक्षण केंद्र हे वरणगांवलाच कार्यान्वित करावे ,तसेच यासाठी भुसावळ तालुका काँग्रेस कमिटीद्वारे व औरंगाबाद येथील सायबर शाखेने दै.दिव्य मराठीचे प्रकाशक, संपादक व पत्रकार यांचेवर गुन्हे दाखल केले ते गुन्हे मागे घेऊन रद्द करण्यात यावे यासाठी जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागातर्फे भुसावळ येथील प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उत्तर महाराष्ट्राचे समन्वयक योगेंद्रजी पाटील, जळगांव जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे, भुसावळ तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पंकज पाटिल, जिल्हा सरचिटणीस रहीम कुरेशी,उपाध्यक्ष इस्माईल गवळी,तालुका सचिव ग्यानेश्वर पाटिल, उपाध्यक्ष रवि पाटील,अनु जाती विभागाचे शहराध्यक्ष सुनिल जोहरे,विजय तुरकेले, दिलीप क्षिरसागर, संदिप मोरे उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *