साईनगर शिर्डी–बिकानेर विशेष गाडीला तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त शयनयान व वातानुकूलित तृतीय श्रेणी कोचची सुविधा

(प्रतिनिधी)-

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन प्रवाशांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी साईनगर शिर्डी–बिकानेर विशेष साप्ताहिक गाडीला तात्पुरत्या स्वरूपात एक अतिरिक्त शयनयान आणि एक वातानुकूलित तृतीय श्रेणी कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, संबंधित विशेष गाड्यांना खालीलप्रमाणे अतिरिक्त कोच जोडण्यात येणार आहेत.

गाडी क्र. 04716 – साईनगर शिर्डी–बिकानेर विशेष साप्ताहिक गाडी प्रवास सुरू दिनांक ८ नोव्हेंबर २०२६ ते २९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत एक अतिरिक्त शयनयान कोच आणि एक वातानुकूलित कोच जोडण्यात येईल.
गाडी क्र. 04715 – बिकानेर–साईनगर शिर्डी विशेष साप्ताहिक गाडी प्रवास सुरू  दिनांक ८ नोव्हेंबर २०२६ ते २९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत एक अतिरिक्त शयनयान कोच आणि एक वातानुकूलित कोच जोडण्यात येईल.

प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.