भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चारही बीटमध्ये हातभट्टी दारू तयार करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली. गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजता करण्यात आलेल्या या कारवाईत २७० लिटर हातभट्टीची दारू आणि २ हजार ८०० लिटर कच्चे रसायन असा एकूण १ लाख ६६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. या कारवाईमुळे हातभट्टी दारू तयार करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. चारही बीटमध्ये कारवाई या मोहिमेत दीपनगर दूरक्षेत्रांतर्गत संशयीत आरोपी पिंप्रीसेकम येथील अशोक तायडे आणि फेकरी येथील रितेश सूर्यवंशी यांच्याशी संबंधित ठिकाणी कारवाई करण्यात आली. कुऱ्हा-पानाचे दूरक्षेत्रांतर्गत बेलव्हाय येथील निवृत्ती सोनवणे आणि वराडसीम येथील विलास सपकाळे यांच्याशी संबंधित ठिकाणीही कारवाई करण्यात आली. साकेगाव बीटमध्ये सागर सोनवणे, भगवान कोळी आणि केशव मराठे (साकेगाव), तर किन्ही बीटमध्ये उस्मान गवळी, खलील गवळी आणि युनूस गवळी (कन्हाळे) यांच्याशी संबंधित ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली. या सर्व ठिकाणांहून हातभट्टीची दारू आणि दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे कच्चे रसायन जप्त करून नष्ट करण्यात आले. एकूण २७० लिटर हातभट्टीची दारू व २ हजार ८०० लिटर कच्चे रसायन असा १ लाख ६६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. पोलीस पथकाचा सहभाग या कारवाईत पोलीस हेड कॉन्स्टेबल वाल्मिक सोनवणे, सुभान तडवी, विकास बाविस्कर, सुधीर विसपुते, इस्तियाक शेख, हेमंत मिटकरी, रशिद तडवी, सुभाष सोनवणे, सचिन पारधी, न्याजजोद्दीन तडवी, किरण तायडे, जगदीश भोई आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल लीना लोखंडे यांनी सहभाग घेतला. संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांनी दिली. हातभट्टी दारू निर्मिती व विक्रीविरोधात पोलिसांकडून अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.


