भुसावळ प्रतिनिधी : वरणगाव रोडवरील जिओ पेट्रोल पंपाच्या शेजारी असलेल्या नालीमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर बाजारपेठ पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी घटनास्थळी पाहणी केली. पोलिसांकडून पुढील तपास सुरू नालीमध्ये मृतदेह नेमका कसा आला, संबंधित व्यक्तीची ओळख काय आहे आणि मृत्यूचे कारण काय, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलिसांच्या तपासानंतरच या घटनेबाबत अधिक माहिती स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस पुढील तपास करत आहेत


