भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळासाठी अँकशन प्लॅन तयार करण्यात येणार असून कॉन्टेक्ट ट्रेसिंग वाढवण्याची गरज असल्याचे निर्देश देण्यात आले असून जास्तीत जास्त दोन दिवसात रुग्णांचा तपासणी अहवाल प्राप्त होईल, अशी व्यवस्था आता केली असून मृत्यूदर नियंत्रणात आणावा तसेच आरोग्य विभागाने शहरात सर्वेक्षण करावे तसेच संशयीत रुग्णांची माहिती काढावी,यासह भुसावळ करीता अँक्शन प्लॉन तयार करावा अशा सूचना जिल्ह्याचे नूतन जिल्ह्याधिकारी अभिजित राऊत यांनी दिल्या .
जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या २५८९ इतकी झाली आहे.या पार्श्वभूमीवर
जिल्ह्याचे नूतन जिल्ह्याधिकारी अभिजित राऊत यांनी भुसावळ येथे भेट देवुन कोव्हिड सेंटरची पाहणी केली.
यावेळी कॉन्टेक्ट ट्रेसिंग वाढवण्याची गरज असून जास्तीत जास्त दोन दिवसात रुग्णांचा तपासणी अहवाल प्राप्त होईल, अशी व्यवस्था आता केली जात आहे. मृत्यूदर नियंत्रणात आणण्याकरिता तसेच आरोग्य विभागाने शहरात सर्वेक्षण करावे तसेच संशयीत रुग्णांची माहिती काढावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या
तसेच बद्री प्लॉट ,भोई नगर मधील कंटेन्मेंट झोनची पाहणी केली.भुसावळ शहरात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर सरासरी ११ टक्के आहे. कोरोना रुग्णांची संख्या ३७० च्या वर पोहचली आहे. दरम्यान भुसावळ शहरातील रेल्वे हॉस्पिटल कोव्हिड सेंटरला भेट दिली.तसेच कंटेन्मेंट झोन पाहणी केली.कोरोनावर नियंत्रण
मिळवण्यासाठी जास्तीत जास्त रुग्णांचे स्वॅब घ्यावेत तसेच निगेटीव्ह अहवाल आलेल्या रुग्णांना तातडीने डिस्चार्ज द्यावा,
यादरम्यान नगरसेवक निर्मल कोठारी यांनी जिल्ह्याधिकारी यांना निवेदन दिले.
प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांकडून वेळोवेळी माहिती घेवून त्या आधारे भुसावळासाठी स्पेशल अँकशन प्लॅन तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले .भुसावळ शहरातील लोकांची जास्तीत जास्त प्रमाणात तपासणी करण्यात यावी, जास्त त्रास होण्याच्या अगोदर कोव्हिड सेंटर मधून उपचार घेतल्यास नक्कीच मृत्युदर कमी होणार असेही जिल्ह्याधिकारी अभिजित राऊत यांवेळी म्हणाले .
बैठकीला प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, तहसीलदार दीपक धीवरे, डीवायएसपी गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, शहर निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, तालुक्याचे निरीक्षक चंद्रकांत कुंभार, प्रभारी मुख्याधिकारी अविनाश गांगुर्डे, नगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संगीता दवंगे आदींची उपस्थिती होती.



