;
भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळच्या विकास कामांना पूर्ण वेळ मुख्याधिकारी नसल्याने ब्रेक लागला असून शहराला पूर्ण वेळ मुख्याधिकारी द्यावा अथवा भुसावळ पालिकेच्या मुख्याधिकारी करुणा डहाळे यांना पूर्ववत कामावर रूजू करून विकासकामांना चालना द्यावी
मुख्याधिकारी करुणा डहाळे यांच्या कामाची पद्धतीत चुकी नसल्यास त्यांच्याकडे पूर्ववत भुसावळचा पदभार सोपवावा अशी मागणी नगरसेवक पिंटू कोठारी यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे बुधवारी केली.
निवेदनात नमूद आहे की डहाळे यांच्या काळात शहरात २५ कोटी रुपयांच्या विकासकामांना चालना मिळावी शिवाय त्यांच्या काळात दररोज २५० ते ३०० स्वॅब घेतले जात होते शिवाय रुग्ण आढळल्यानंतर परीसर सील करणे, निर्जंतुकीकरण करणे आदी कामे केली जात होती मात्र आता प्रभारी मुख्याधिकारी नेमण्यात आल्याने व आठवड्यातून केवळ दोन दिवस ते शहराला देणार असल्याने मोठी गैरसोय होत आहे.
शहरात कोरोना रुग्णांचे वाढलेले प्रमाण तसेच विकासकामांना चालना मिळण्यासाठी शहराला पूर्णवेळ मुख्याधिकारी द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे कोठारी यांनी केली आहे. शिवाय डहाळे यांच्याकडे पूर्ववत भुसावळचा पदभार सोपवावा शिवाय डहाळे यांच्या कामाची पद्धत चुकीची असल्यास अन्य मुख्याधिकारी पूर्णवेळे करीता द्यावा, असेही निवेदनात म्हटले आहे.



