भुसावळ (प्रतिनिधी )-
तालुक्यातील खडका-किन्ही रस्त्यावरील इंदिरा नगर भागातून अवैधरीत्या दारूची विक्री करताना संशयीत आरोपी गणेश जनार्दन मंडलीक (खडका) यास भुसावळ तालुका पोलिसांनी गस्तीदरम्यान मंगळवारी अटक केली. आरोपी मंडलीक विरुद्ध भुसावळ तालुका पोलिसात प्रोव्ही कायदा प्रमाणे आणि जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या संचारबंदी आदेशाचे अवमानता केल्याने भादवि कलम 188, 269 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
त्याच्या ताब्यातून टँंगो पंच देशी दारूच्या 180 एम.एल. च्या 48 बाटल्या तसेच 90 एम.एल. च्या 48 बाटल्या मिळून तीन हजार 744 रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, हवालदार शामकुमार मोरे, हवालदार विठ्ठल फुसे, नाईक प्रेमचंद सपकाळे यांनी केली.



