भुसावळ (प्रतिनिधी )- येथील श्री राधाकृष्ण प्रभात फेरीचा १३ व्वा वर्धापन दिन ६ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ही प्रभात फेरी म्हणजे सर्व हिंदू धर्मीय बंधू-भगिनींची एकजूट दाखवणारी एक 'एकता रॅली' आहे. गेल्या १३ वर्षांपासून अविरतपणे दररोज सकाळी ६:१५ ते ६:३० वाजेच्या दरम्यान प्रत्येक वॉर्डातील गल्लीबोळातून ही फेरी निघते. यामध्ये सुमारे ८० ते १०० नागरिक एकत्र येऊन देवांची भजने व भक्तीगीते वाजत-गाजत गातात. ६ ऑगस्ट रोजी या प्रभात फेरीला १३ वर्षे पूर्ण होऊन १४ व्या वर्षात पदार्पण झाले आहे. या निमित्ताने आज पहाटे पुरातन श्रीराम मंदिरात मोठ्या उत्साहात भजने व भक्तीगीते गाण्यात आली. तसेच देवांची आरती करून उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी यांनी प्रभात फेरीच्या १३ वर्षांचा संपूर्ण इतिहास उपस्थितां समोर मांडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पंडित जगदीश शर्मा,जे.बी.कोटेचा,प्रा.जे पी सुचिक,संत शरण गुप्ता,सुनिल लाहोटी उपस्थित होते.तर आभार संजय अग्रवाल यांनी मानले. फोटो कॅप्शन - भुसावळ येथे राधाकृष्ण प्रभात फेरीचा वर्धापन दिनानिमित्त उपस्थित राधाकृष्ण प्रभात फेरीचे सदस्य.


