भुसावळ (प्रतिनिधी )-
युवासेना प्रमुख व महाराष्ट्र राज्य पर्यटन मंत्री ना.आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवभोजन केंद्र संचालक व शिवसैनिक उमाकांत (नमा)शर्मा ,शिवसेना नगरसेवक मुकेश गुंजाळ ,यांनी वृक्ष वाटपासह नागरिकांची प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून आर्सेनिक अल्बम ३० गोळ्याचे वितरण , मास्क वाटप, तसेच गोरग़रीब व गरजू लोकांना अन्नदान वाटप यासह विविध
सामाजिक उपक्रम राबवण्यात येवून वाढदिवस साजरा केला .
यावेळी मिलिंद कापडे, शाखा प्रमुख धीरज वरढोनकर, राजेश सोनी, प्रणव डोलारे, लोकेश वारके, ऋषभ जैन, ऋषभ अग्रवाल ,शाखा प्रमुख गौरव शर्मा, आदि शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते . पावसाळा असल्याने नागरिकांनी वृक्ष लावून पर्यावरण वाचवावें म्हणजे कोरोना सारखे असे भयंकर विषाणू येणार नाही. आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी, शासनाच्या नियमांचे सर्वानी पालन करावे यामध्ये आपलेच हित आहे असे मनोगत यावेळी उमाकांत शर्मा (नमा) यांनी व्यक्त केले.



