कोरोना विषयावरती जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन


वरणगाव (प्रतिनिधी)-
सामाजिक स्तरावर ती विद्यार्थ्यांच्या माध्यमातून कोरोना विषाणूची जनजागृती होऊन उपाय योजनांची माहिती व्हावी यासाठी जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव, डॉ एपीजे अब्दुल कलाम व डॉ सी व्ही रमण विपनेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे
या स्पर्धेसाठी दोन गट असून इयत्ता सहावी ते आठवी लहान गट इयत्ता नववी ते बारावी मोठा गट असुन दोन्ही गटांसाठी परंपरा जपूया कोरोनाला हरवूया, कोरोना इष्टापत्ती का दृष्टापती, आजीचा बटवा कोरोनाला चकवा या तीन विषयावरती मोठ्या गटाला चार मिनिटे व लहान गटाला तीन मिनिटे वकृत्व द्यायचे आहेत सदर स्पर्धा ही ऑनलाईन झूम ॲप द्वारा घेतली जाणार असून स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे या स्पर्धेचे नोंदणी करण्यासाठी जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाच्या ब्लॉग वरती भेट देऊन नोंदणी करायची आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *