भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाच्या पाश्वभुमीवर आज दि.६ जुन शनिवार रोजी पोलीसांनी पोलीस पथकासह डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते रजा टाॅवर चौक,खडका रोड सह विविध भागात जोरदार पथसंचलन करुन शक्ती प्रदर्शन केले.
यात उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड,बाजारपेठचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत,तालुक्याचे रामकृष्ण कुंभार आदी सहभागी होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड म्हणाले कि,कोरोना आजाराने जगभरात हाहाकार माजविला असून भुसावळ शहरात काही नागरिक लाॅकडाऊन काळात नियमांचे उल्लंघन करीत आहे.नियमांचा भंग केल्यास निश्चितच कारवाई होईल.
देशभरात कोरोनापासून नागरिकांना वाचवण्यासाठी शासन,प्रशासन व पोलीस यंत्रणा दिवसरात्र सज्ज असल्याचे राठोड यांनी स्पष्ट केले.या पथकात अधिकारी,कर्मचारी, आरसीपी प्लाटूनचे कर्मचारी सहभागी होते



