तापी पुलावरून उडी घेत एकाची आत्‍महत्‍या ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील तापी नदी पुलावरून पात्रात उडी घेऊन एका तरुणाने आत्‍महत्‍या केल्‍याची घटना आज दि.२ जुन रोजी दुपारी १२-३० वाजेदरम्‍यान घडली.
स्‍थानिक तापी नदी काठावरील राहुल नगरातील रहिवासी रवी शामराव भालेराव(वय ३०)या तरुणाने आज दि.२ जुन रोजी दुपारी १२-३० वाजेदरम्‍यान यावल रस्‍त्‍यावरील तापी नदी पुलावर जात सरळ पुलावरून नदी पात्रात उडी घेतली.या घटनेनंतर रस्‍त्‍यावरील वाहनधारकांनी पुलावर एकच गर्दी केली होती.घटनेची माहिती मिळताच भुसावळ शहर पोलीसांनी धाव घेतली व मृतदेह नदी पात्रातून बाहेर काढले.या प्रकरणी उशिरापर्यंत अकस्‍मात मृत्‍यूची नोंद नव्‍हती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *