भुसावळ (प्रतिनिधी ) – श्री हनुमान जयंतीनिमित्त भुसावळ येथील सूर्यमुखी श्री हनुमान मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जयंतीच्या पूर्वसंध्येला, दि. 1 एप्रिल रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता मंदिरामध्ये 51 मुलांकडून सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्यात येणार आहे.

या उपक्रमासाठी आयोजकांकडून मुलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुक मुलांनी त्वरित आपली नावे नोंदवावीत, असेही सांगण्यात आले आहे. सहभागी होणाऱ्या प्रत्येक मुलाला सर्टिफिकेट देण्यात येणार असून, पुढील कार्यक्रमामध्ये त्याचे वितरण करण्यात येईल.
यावल रोड वरील सुप्रसिद्ध बंडू वडापाव सेंटर समोर, असलेल्या या मंदिरात मुलांनी मंदिरात येताना हनुमान चालीसा पुस्तक सोबत आणणे आवश्यक आहे, अशी सूचना आयोजकांनी केली आहे.
अधिक माहितीसाठी मा. पिंटु भोई (9673069128), मा. संजय भोई (9322190819) व मा. आदर्श पांडा (9422777886) यांच्याशी संपर्क साधावा.


