भुसावळ (प्रतिनिधी )-
येथिल बियाणी पब्लीक स्कुल मधील कॉप्यूटर लॅब मधील ३ कॉप्यूटर (संगणक) व प्रिंटर अंदाजे किमत्त 1 लाख दहा हजार रू चे अज्ञात चोरट्यांनी लॉक डाऊन मध्ये शाळा बंद असतांना शाळेतील कॉप्युटर (संगणक) लॅब रुम मधून दरवाज्याचे कुलूम तोडून चोरुण नेले ही घटना दि २९ रोजी उघडकीस आली, याबाबत बाजारपेठ पोलीसात नोंद करण्यात आली,
लॉक डाऊन चा फायदा घेउन चोरी केली असावी असे शाळेचे सेक्रेटरी संगीता बियाणी यांनी सांगीतले. त्या म्हणाल्या की शाळेत या आधी कधीच चोरी झाली नाही,लॉक डाऊन चा फायदा घेऊन चोरट्यांनी चोरी केली असल्याचे त्या म्हणाल्या. सीसीटीव्हित चोरटे कैद झाले असल्याचे बोलले जात आहे. पोलीसांना एका प्रकारे चॅलेज करत चोरट्यांनी भर वस्तीत बियाणी शाळेतील संगणक लोरल्याची चर्चा आज दिवसभर शहरात होती.



