भुसावळ (प्रतिनिधी ) – जागतिक महिला दिन निमित्त अवधूत मल्टिपर्पज फाउंडेशन, भुसावळ यांच्या वतीने नारीशक्ती गौरव सोहळा व महिला उद्योजकता समारोह आयोजित करण्यात आला आहे. रविवार, दि. 08 मार्च 2026 रोजी सकाळी 09:वाजता हा कार्यक्रम पार पडणार असून विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.

महिलांचे आरोग्य, व्यवसाय संधी आणि रोजगार निर्मिती या विषयांवर मार्गदर्शनपर सत्राचे आयोजन करण्यात आले असून महिलांना स्वावलंबी बनण्यासाठी उपयुक्त माहिती कार्यक्रमात देण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम रोटरी क्लब हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून आकर्षक मेहेंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असून स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी मयुरी ब्युटी पार्लर येथे मो. 9923010623 या क्रमांकावर संपर्क साधावा.
कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेला संस्थेमार्फत सन्मानपत्र देण्यात येणार असून परिसरातील सर्व महिलांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


