मुक्ताईनगर (प्रतिनिधी)-
जळगांव येथील आढावा बैठक आटपून अकोला येथील आढावा बैठकीसाठी जाणाऱ्या कृषी मंत्री दादा भुसे यांनी मुक्ताईनगर येथे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी धावती भेट दिली .यावेळी आमदार पाटील यांनी कृषी मंत्री भुसे यांचे स्वागत केले व आदिशक्ती श्री संत मुक्ताई यांची प्रतिमा भेट दिली आणि आंब्याचे दोन वृक्ष देऊन सत्कार केला .तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी (शेळी , ठिबक सिंचन संच , विद्युत मोटार पाईप संच ) पूर्व पुन्हा संमती द्यावी व पोकरा योजनेत मुक्ताईनगर , बोदवड व रावेर तालुक्यातील उर्वरीत गावांचा समावेश करावा या मागणीचे लेखी निवेदन देखील दिले .
प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख छोटू भोई , विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील , काँग्रेस चे ऍड अरविंद गोसावी , संदेश पाटील , तालुका कृषी अधिकारी बी.जी. व्यवहारे , शहर संघटक वसंत भलभले ,शहरप्रमुख गणेश टोंगे , गटनेता राजेंद्र हिवराळे, दिलीप पाटील, प्रवीण बोरसे, नगरसेवक संतोष मराठे , माजी उपजिल्हा प्रमुख गोपाळ सोनवणे , तुषार बोरसे , उज्वल बोरसे , स्वीय सहायक प्रवीण चौधरी , संतोष कोळी , उपस्थित होते



