मुंबई (प्रतिनिधी ) – होळी सणाच्या पार्श्वभूमीवर वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेऊन भारतीय रेल्वे प्रशासनाने ३० अतिरिक्त होळी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यात लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) – सुलतानपूर/वाराणसी दरम्यान ८ विशेष फेऱ्या तसेच एलटीटी – रक्सौल/सहरसा/धनबाद मार्गांवरील २२ फेऱ्यांचा समावेश आहे.

एलटीटी – सुलतानपूर / वाराणसी (८ एसी विशेष फेऱ्या)
एलटीटी – सुलतानपूर एसी विशेष (४ फेऱ्या)
गाडी क्र. ०४२११ दि. २७ फेब्रुवारी व ३ मार्च २०२६ रोजी दुपारी २.३५ वाजता एलटीटी येथून सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ११ वाजता सुलतानपूर येथे पोहोचेल.
गाडी क्र. ०४२१२ दि. २६ फेब्रुवारी व २ मार्च २०२६ रोजी पहाटे ४ वाजता सुलतानपूर येथून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२.२० वाजता एलटीटी येथे पोहोचेल.
एलटीटी – वाराणसी एसी विशेष (४ फेऱ्या)
गाडी क्र. ०४२२५ दि. २६ फेब्रुवारी व २ मार्च २०२६ रोजी दुपारी २.३५ वाजता एलटीटीहून सुटून तिसऱ्या दिवशी पहाटे २.०५ वाजता वाराणसी येथे पोहोचेल.
गाडी क्र. ०४२२६ दि. २५ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी पहाटे १.३५ वाजता वाराणसीहून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२.२० वाजता एलटीटी येथे पोहोचेल.
या गाड्यांना ठाणे, कल्याण, नाशिक रोड, चाळीसगाव, पाचोरा, भुसावळ, खंडवा, इटारसी, राणी कमलापती, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओरई, कानपूर सेंट्रल, लखनौ आदी प्रमुख स्थानकांवर थांबे असतील. वाराणसी विशेष गाड्यांना सुलतानपूर व जौनपूर सिटी येथेही थांबा दिला आहे.
रचना : १६ एसी ३-टियर इकॉनॉमी डबे व २ जनरेटर व्हॅन.
एलटीटी – रक्सौल / सहरसा / धनबाद (२२ फेऱ्या विस्तार)
एलटीटी – रक्सौल (८ फेऱ्या)
गाडी क्र. ०५५५८ (एलटीटी–रक्सौल) दि. १२ मार्च ते २ एप्रिल २०२६ दरम्यान प्रत्येक गुरुवारी, तर गाडी क्र. ०५५५७ (रक्सौल–एलटीटी) दि. १० मार्च ते ३१ मार्च २०२६ दरम्यान प्रत्येक मंगळवारी धावणार आहे.
एलटीटी – सहरसा (८ फेऱ्या)
गाडी क्र. ०५५८६ (एलटीटी–सहरसा) दि. ८ मार्च ते २९ मार्च २०२६ दरम्यान प्रत्येक रविवारी, तर गाडी क्र. ०५५८५ (सहरसा–एलटीटी) दि. ६ मार्च ते २७ मार्च २०२६ दरम्यान प्रत्येक शुक्रवारी चालविण्यात येईल.
एलटीटी – धनबाद (६ फेऱ्या)
गाडी क्र. ०३३८० (एलटीटी–धनबाद) दि. १२ मार्च ते २६ मार्च २०२६ दरम्यान प्रत्येक गुरुवारी, तर गाडी क्र. ०३३७९ (धनबाद–एलटीटी) दि. १० मार्च ते २४ मार्च २०२६ दरम्यान प्रत्येक मंगळवारी धावेल.
या विस्तारित गाड्यांच्या वेळापत्रक, थांबे व रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
आरक्षणाची माहिती
गाडी क्र. ०५५५८, ०५५८६ व ०३३८० यांचे आरक्षण २० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होईल.
एसी होळी विशेष गाडी क्र. ०४२११ व ०४२२५ यांचे आरक्षण २२ फेब्रुवारी २०२६ पासून उपलब्ध होईल.
आरक्षण सर्व संगणकीकृत केंद्रांवर तसेच IRCTC च्या www.irctc.co.in संकेतस्थळावर उपलब्ध असेल. प्रवासी RailOne ॲप व NTES ॲपच्या माध्यमातूनही वेळापत्रकाची माहिती घेऊ शकतात.
होळीच्या पार्श्वभूमीवर या अतिरिक्त गाड्यांमुळे मुंबई व उत्तर भारतादरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.


