भुसावळच्या सौ. मनीषा पाटील यांना राज्यस्तरीय ज्ञानवंत समाजसेवक पुरस्कार


जळगाव : सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल बहिणाई ब्रिगेडच्या भुसावळ शहराध्यक्ष सौ. मनीषा संजय पाटील यांना राज्यस्तरीय “ज्ञानवंत समाजसेवक” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जनमत प्रतिष्ठान व मुक्ताई बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सन्मान सोहळा व बक्षीस वितरण समारंभ रविवार, दि. 15 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथील अल्पबचत भवन येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या सोहळ्यात माजी महापौर जयश्री महाजन यांच्या शुभहस्ते सौ. पाटील यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास माजी डायट प्राचार्य निळकंठ आप्पा गायकवाड, जळगाव शहराचे आमदार राजू भोळे, नवनिर्वाचित महापौर दीपमाला काळे तसेच भुसावळ नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या कार्याबद्दल सौ. मनीषा पाटील यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.