पैसठीया यंत्र जप कार्यक्रमाचे आयोजन

भुसावळ (प्रतिनिधी) – येथील बिजली कॉलनीमधील रहिवासी राजेश प्रेमचंद बाफना यांच्या निवासस्थानी उद्या सोमवार दिनांक १६ रोजी रात्री साडेआठ ते साडेनऊ या वेळेत पैसठीया यंत्र जप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संघपती जयंतीलाल सुराणा, जे. बी. कोटेचा, गौतम चोरडिया व अतुल ताथेड यांनी केले आहे.