भुसावळमध्ये ८ फेब्रुवारीला “रोटरी सायक्लोथॉन २०२६”-स्वच्छ व प्रदूषणमुक्त शहरासाठी सायकल रॅलीचे आयोजन :

भुसावळ (प्रतिनिधी ) –
रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी व ना. संजय सावकारे यांच्या संयुक्त विद्यमाने भुसावळकरांसाठी बहुप्रतिक्षित “रोटरी सायक्लोथॉन २०२६” चे आयोजन करण्यात आले आहे. स्वच्छ, हरित व प्रदूषणमुक्त भुसावळ या संदेशासाठी ही सायकल रॅली रविवार, दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ६ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान (डी.एस. ग्राउंड), भुसावळ येथून सुरू होणार आहे.

या सायक्लोथॉनमध्ये २० किमी, १० किमी व ५ किमी अशा तीन अंतरांच्या रॅलीचा समावेश असून सर्व वयोगटातील नागरिक सहभागी होऊ शकतात. प्रत्येक अंतरासाठी नोंदणी शुल्क फक्त ₹२०० इतके ठेवण्यात आले आहे.

सहभागी सायकलपटूंना गुडी बॅग, टी-शर्ट, सहभाग प्रमाणपत्र (Completion Certificate), रूट सपोर्ट, रॅलीनंतर नाश्ता तसेच इतर अनेक सुविधा देण्यात येणार आहेत. यासोबतच लकी ड्रॉद्वारे सायकल व इतर आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधीही उपलब्ध असणार आहे.

गुडी बॅग व टी-शर्ट वितरणासाठी “सायक्लोथॉन एक्स्पो” चे आयोजन शनिवार, दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १ ते ५ या वेळेत प्रभाकर हॉल येथे करण्यात आले आहे.

नोंदणीसाठी प्रभाकर हॉल, कल्पना रसवंती, अष्टभुजा डेअरी, यावलकर कॉम्प्युटर्स, अंबिका स्टोन व सुंदर नगर मेडिकल येथे संपर्क साधता येईल.

या कार्यक्रमाबाबत माहिती देताना
प्रोजेक्ट चेअरमन रो. महेंद्र (सोनू) मांडे,
प्रोजेक्ट को-चेअरमन रो. सचिन अग्रवाल,
अध्यक्ष रो. देवेंद्र (देवा) वाणी
आणि सचिव रो. हरमीतसिंग माखन
यांनी भुसावळकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या उपक्रमाला यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.