भुसावळ (प्रतिनिधी)-
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने भुसावळ ते नागपूर दरम्यान अनारक्षित विशेष रेल्वेगाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही विशेष गाडी ७ व ८ फेब्रुवारी २०२६ रोजी धावणार आहे.

गाडी क्रमांक ०११०१ विशेष ही भुसावळ येथून सकाळी ७.५० वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी २.३० वाजता नागपूर येथे पोहोचेल.
तर गाडी क्रमांक ०११०२ विशेष ही नागपूर येथून दुपारी ३.३० वाजता सुटून रात्री ९.५० वाजता भुसावळ येथे पोहोचेल.
या विशेष रेल्वेगाडीला बोदवड, मलकापूर, नांदुरा, जलंब, शेगांव, अकोला, बोरगांव, मूर्तिजापूर, बडनेरा, चांदूर, धामणगांव, वर्धा आणि अजनी या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
या गाडीची संरचना १२ कार मेमू अशी असून ही गाडी पूर्णतः अनारक्षित असेल.
या विशेष रेल्वेगाडीचे सविस्तर वेळापत्रक व थांब्यांची माहिती जाणून घेण्यासाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा NTES ॲप डाउनलोड करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.



