गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजनभक्तांसाठी दिवसभर महाप्रसाद वाटप :

भुसावळ (प्रतिनिधी) – येथील जामनेर रोडवरील श्री गजानन महाराज देवस्थानच्या वतीने श्री संत गजानन महाराज यांच्या १४८ व्या प्रगट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने गुरुवार दि. ६ फेब्रुवारी रोजी शहरातील प्रमुख मार्गावरून श्री गजानन महाराजांची पालखी काढण्यात येणार आहे.

रविवार दि. ८ फेब्रुवारी रोजी प्रगट दिनानिमित्त पहाटे ५.३० ते ७.३० या वेळेत श्रींचे स्नान, अभिषेक व पूजा होणार असून सकाळी ६ वाजेपासून सामूहिक पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच भाविकांसाठी सकाळी ९ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत महाप्रसादाचे दिवसभर वाटप करण्यात येणार आहे.

पालखी सोहळ्याचा मार्ग अष्टभुजादेवी मंदिर, बाजारपेठ पोलीस स्टेशन, भुसावळ मेडिकल, सराफ गल्ली, मरिमाता मंदिर, अप्सरा चौक, भारत मेडिकल, अष्टभुजा मंदिर, नाहाटा चौफुली ते श्री गजानन महाराज मंदिर, जामनेर रोड असा राहणार आहे.

महाप्रसादासाठी साहित्य किंवा देणगी देऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी जामनेर रोडवरील श्री गजानन महाराज मंदिरातील सेवेकऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असेही कळविण्यात आले आहे.