भुसावळ, (प्रतिनिधी) –प्रजासत्ताक दिन संविधानाचे महत्त्व विशद करीत भुसावळ शहरातील विविध शैक्षणिक सामाजिक राजकीय व शासकीय कार्यालयांमध्ये , शाळा, महाविद्यालय, विविध राजकीय पक्षकार्यालये , सेवाभावी संस्था यासह नगरपरिषद , रेल्वेसह प्रशासनाच्या वतीने ठिकठिकाणी ध्वजारोहण संपन्न झाला यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.

भुसावळ नगरपरिषद भुसावळ नगरपरिषदेच्या मुख्य इमारतीत सकाळी ८.१५ वाजता ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून हा कार्यक्रम नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा . सौ. गायत्री चेतन भंगाळे (गौर) यांच्या हस्ते संपन्न झाला यानंतर सकाळी १० वाजता जुने नगरपरिषद कार्यालय, रेल्वे स्टेशनजवळ येथे अन्नदान करण्यात आले.
शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम
प्रजासत्ताक दिनाचा शासकीय ध्वजारोहण सकाळी ९.१५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रांगण (जुने डी. एस. हायस्कूल प्रांगण), भुसावळ येथे उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर तहसील कार्यालयात तहसीलदार नीता लबडे रेल्वे मैदानावर डी आर एम पुनीत अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले
या सर्व कार्यक्रमांना शासकीय अधिकारी व कर्मचारी पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी, माजी आमदार संतोष चौधरी , नगराध्यक्ष सौ गायत्री भंगाळे, यांचेसह नगरसेवक, होमगार्ड, बँड पथक ज्येष्ठ नागरिकांसह प्रतिष्ठित , विदयार्थी, मोठ्या संख्येने उपस्थित होते., तहसील कार्यालयात तहसीलदार नीता लबडे रेल्वे मैदानावर डी आर एम पुनीत अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले
एम आय तेली हायस्कूल चे संचालक हाजी आयुब शेख हाजी रहिमदिन खान श्रीमान तड वी हाजी साबीर शेख माजी नगराध्यक्ष अख्तर पिंजारी शेख तेली मुख्याध्यापकाची सय्यद वाजीद उपस्थित होते विद्यार्थ्यांनी नृत्य , वेशभूषा, रंगभूषा सादर केल्या
द वर्ल्ड स्कूल मध्ये अध्यक्ष निशिकांत कोलते राजश्री कोलते सीए रोहित कोलते व प्रमुख पाहुणे सैनिक प्रतिनिधी वीरेंद्र ठाकरे उपस्थित होते जेसीआय महिला अध्यक्ष हेमा बेहरा सचिव रेखा व्यास व प्रोजेक्ट चेअरमन उर्वशी भटे जा यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण झाले मुख्याध्यापिका ब्रिटिशा ह्या सेट व शिक्षक उपस्थित होते
सी सुशीला बाई फालक प्राथमिक विद्यामंदिरात महिला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आरती चौधरी यांचे असते ध्वजारोहण झाले विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत भाषणे कवायती प्रात्यक्षिके व नृत्य सादर केली. संस्था अध्यक्ष हरिश पालक किरण फालक दिनेश पालक पराग तळले, नामदेवराव पाटील शाळेचे मुख्याध्यापक हरीश कोल्हे उपस्थित होते.
शैक्षणिक संस्था देशभक्तीपर कार्यक्रम
कोटेच्या बालवाडी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रजासत्ताक दिन साजरा झाला श्री सरस्वती विद्या प्रसारक मंडळाचे सचिव राजेश राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले संजय सुराणा श्रीकृष्ण १८ , डॉक्टर संदीप जैन उपस्थित होते
बालविवाह मुक्त अभियान
खडके येथे बालविवाह मुक्त भारत व बालविवाह मुक्त जळगाव जिल्हा अभियानांतर्गत रॅली काढण्यात आली सरपंच यशोधरात तायडे उपसरपंच अर्चना पाटील ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील मुख्याध्यापक शिक्षक व ग्रामस्थ सहभागी झाले आधार व उद्देशीय संस्था अंमळनेर व बालकल्याण समितीने जनजागृती केली संविधान वाचन प्रभात फेरी काढली पुंडलिक मराठी शैक्षणिक संकलना संकुलात संस्था अध्यक्ष परीक्षेत बराटे यांच्या अस्तित्वजारोहण झाले विद्यार्थ्यांनी कवायत व नृत्य सादर केले प्रभात फेरी काढली उपाध्यक्ष पी एस लोखंडे दिपाली बराटे रमाशंकर दुबे मुख्याध्यापक पीजे चौधरी मुख्याध्यापिका हेमांगिणी चौधरी उपस्थित होते
श्री स्वामीनारायण गुरुकुल धीरज कुरकुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले पीएस लोखंडे शशिकांत कोल्हे जे के भिरुड संचालक गोपाळ भरत भगत लता भारुड उपस्थित होते प्राथमिकचे मुख्याध्यापक मनोज भोसले मुख्याध्यापिका प्रणिता चौधरी यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी मानवी मनोरे रचन एकता व शौर्याचा संदेश दिला
शिवपुराण कथेचे शहिदांना श्रद्धांजली
प्रतिष्ठान मंडळातर्फे शिव पुराण कथेचे आयोजन केले आहे त्यात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला परिसरात नागरिकांतर्फे देश यासाठी शहीद झालेल्या जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
फोटो ओळ – शासकीय ध्वजारोहण प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील , सांस्कृतिक कार्यक्रमात कलागुण सादर करताना ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी., भुसावळातील डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कलागुण सादर करताना विद्यार्थी.



