भुसावळ (प्रतिनिधी)-
भावसार क्षत्रिय समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा, निवडणूक कार्यक्रम तसेच महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास समाजाचे अध्यक्ष श्रीराम देवताळू व महिला अध्यक्ष सौ. ज्योती भावसार अध्यक्षस्थानी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात गणेश पूजन व फोटो प्रतिमेस माल्यार्पणाने करण्यात आली. समाजातील दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अजेंड्याचे वाचन नितीन भावसार यांनी केले, तर जमाखर्च रमेश पांडव यांनी सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस. पी. भावसार यांनी केले.
दरम्यान, जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२८ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी नूतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली.
नूतन कार्यकारिणी (पुरुष) –
अध्यक्ष : श्रीराम देवताळू
उपाध्यक्ष : प्रा. एस. पी. भावसार
सचिव : नितीन खानोरे
खजिनदार : रमेश पांडव
उपसचिव : राजेंद्र पंचघरे
उपखजिनदार : सचिन भावसार
सदस्य : अनिल पंचघरे, जगदीश बी. भावसार, दिलीप वाघमारे, सूर्यकांत साखरे, निलेश भावसार, दिलीप खुंटे
महिला कार्यकारिणी –
अध्यक्ष : सौ. ज्योती भावसार
उपाध्यक्ष : सौ. नंदा पांडव
सचिव : सौ. राजश्री पांडव
खजिनदार : सौ. ज्योती वाघमारे
उपखजिनदार : सौ. वीणा देवताळू
उपसचिव : सौ. रत्ना साखरे
सदस्या : सौ. अर्चना योगेश भावसार, सौ. जया खारवे, सौ. प्रिया नवलपुरे, सौ. नंदा पांडव
निवड झालेल्या दोन्ही कार्यकारिणींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी समाजाच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. समाजातील गरजू व्यक्तींना आजारपणाच्या उपचारासाठी तातडीची आर्थिक मदत देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
यानंतर मकर संक्रांतीनिमित्त महिलांसाठी हळदी-कुंकू व तिळगूळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास समाजातील महिला व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला.
अध्यक्षीय भाषणात श्रीराम देवताळू यांनी सांगितले की, कोणतेही कार्य करण्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती व सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक असून, त्याच्या बळावर स्त्री-पुरुष कोणतेही कठीण कार्य यशस्वीपणे करू शकतात.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ऍड रमेश पांडव यांनी केले.


